राज की बात..दोन्ही भावात 10 मिनिटं स्वतंत्रपणे चर्चा, काय नेमकं ठरलं?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे गेली अनेक महिने लोकांचे लक्ष लागले आहे, त्यातच आज उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. यावेळी दोन्ही भावात 10 मिनिटं स्वतंत्रपणे चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरगुती गणपती दर्शनाच्या निमित्ताने राजकीय चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. या दोन भावात घरात दहा मिनिटं स्वतंत्रपणे चर्चा झाल्याचे राजकीय क्षेत्रात विविध तर्कवितर्क केले जात आहेत. ही चर्चा नेमकी काय आहे या विषयी अंदाज व्यक्त केले जात आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तब्बल २० वर्षांच्या अंतराने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांचे निवासस्थान गणपती दर्शनाच्या निमित्ताने गाठले आहे.दादर शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी १० मिनिटांची स्वतंत्रपणे आगामी वाटचाली संदर्भात चर्चा केल्याचे समजते आहे. या चर्चेतील तपशील मात्र बाहेर आलेला नाही. राज आणि उद्धव ठाकरे हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात प्रथम एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर तीन महिने ते विविध प्रसंगाने एकत्र असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी अद्याप आमची युती झाली आहे अशी घोषणा मात्र केलेली नाही.
