तुम्हाला शिवराय समजलेत का? राज ठाकरेंचा राज्यपालांना सवाल

तुम्हाला शिवराय समजलेत का? राज ठाकरेंचा राज्यपालांना सवाल

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 8:54 PM

राज ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.  बाबासाहेब पुरंदरे  यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.  बाबासाहेब पुरंदरे  यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं आहे.  शिवाजी महाराज यांनी रामदास स्वामी गुरु होते असं म्हटलेलं नाही, रामदासांनी शिवाजी महाराज शिष्य होते, असं म्हटलेलं नाही. आमच्याकडं योगी सापडत नाही, ईडीची धाड पडली की कळतं श्रीमंत आहे. आमच्याच लोकांना महापुरुषांना बदनाम करायचं, युवकांची माथी भडकवायची  असले उद्योग सुरु आहेत. त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचं झालं नाही, नको तिथं बोट घालायची हे समजत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठणकावलं आहे. तुम्हाला छत्रपती शिवराय समजलेत का असा सवाल राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केला.