MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?

MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?

| Updated on: Aug 10, 2026 | 10:56 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यांदरम्यान त्यांनी स्थानिक प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला होता. यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर काल त्यांनी रायगडचा दौरा करत मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट चर्चा केली.

नाशिक आणि रायगड दौऱ्यानंतर आता राज ठाकरे यांनी मुंबईकडे लक्ष केंद्रित केलं असून, त्यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार असून, सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीत विशेषतः मुंबईतील पश्चिम उपनगरातील पक्षसंघटना आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरातील नवीन नियुक्त्या तसेच पक्षातील काही संघटनात्मक बदलांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये बंडखोरी केलेल्या अनिशा माजगावकर आणि राहुल चव्हाण यांच्याबाबतही महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे. दोघांनाही पुन्हा पक्षात सक्रिय करून नवीन जबाबदारी देण्याचा निर्णय राज ठाकरे घेणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरातील विरोधकांकडून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरूनही विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विविध जनतेच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू ठेवली आहे.

त्यामुळे राज ठाकरे यांच्या नाशिक आणि रायगड दौऱ्यानंतर होणारी ही मुंबईतील बैठक मनसेच्या आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी महापालिका निवडणुका, पक्षातील संघटनात्मक बदल आणि नव्या नियुक्त्यांबाबत राज ठाकरे आज नेमके कोणते निर्णय घेतात, याकडे मनसे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 10, 2026 10:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us