BMC Election  : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी शिंदे गटाची गाठ… शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढणार? काय आहे खेळी?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी शिंदे गटाची गाठ… शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढणार? काय आहे खेळी?

| Updated on: Nov 22, 2025 | 1:26 PM

बीएमसी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने मुंबई महापालिकेसाठी 75 जागांची मागणी केली असून, शिंदे गटातून गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात ताकद दाखवण्याची तयारी केली आहे.

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आव्हान देणार असल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी शिंदे गटाची गाठ असल्याचे दिसतंय. बीएमसी निवडणुकीत मनसे विरुद्ध शिंदे यांची शिवसेना अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. विशेषतः, शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे आपले उमेदवार उभे करून ताकद दाखवणार आहे. महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याचीही चर्चा आहे. मनसेने मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत 75 जागांची मागणी केली आहे. मनसेने मागणी केलेल्या या जागांवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. दुसरीकडे, मुंबई महापालिकेतील प्रारूप मतदार याद्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी मतदार यादीत घोळ करून मुंबई जिंकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Published on: Nov 22, 2025 01:26 PM