गुन्हा का दाखल होत नाही? अपघात धुक्याने की धोक्याने? राज ठाकरेंचे परखड प्रश्न

गुन्हा का दाखल होत नाही? अपघात धुक्याने की धोक्याने? राज ठाकरेंचे परखड प्रश्न

| Updated on: Feb 28, 2026 | 10:11 AM

अजित पवारांच्या कथित विमान अपघातावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला गंभीर प्रश्न विचारले आहेत. घटनेबाबत गुन्हा का दाखल होत नाही, असा सवाल त्यांनी करत यातील काळंबेरं काय, अशी विचारणा केली. रोहित पवार यांनीही एफआयआरसाठी प्रयत्न केले असून, यावर सुनेत्रा पवारांनी बोलावे, असे राज ठाकरे म्हणाले.

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर प्रश्न विचारले आहेत. हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला, हे महाराष्ट्राला अजूनही समजत नाहीये, असे ते म्हणाले. या प्रकरणी गुन्हा दाखल का होत नाही, पोलिसांवर दबाव का टाकला जात आहे, असे सवाल राज ठाकरेंनी केले आहेत.

रोहित पवार यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि अजित पवारांच्या अपघाताच्या तपासासाठी मदत करण्याची विनंती केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी थेट सरकारला प्रश्न विचारत, यात नेमके काय काळंबेरं आहे, अशी विचारणा केली. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणावर बोलले पाहिजे, असे आवाहन केले आहे, कारण हे त्यांच्या पतीच्या अपघाताचे प्रकरण आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला जात असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले असून, सध्या सीआयडी आणि एएआयबी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Published on: Feb 28, 2026 10:10 AM
Follow Us