Raj Thackeray : …तेव्हा महाराष्ट्रात सन्नाटा होता, महायुतीच्या विजयावर राज ठाकरेचं मोठं वक्तव्य, निवडून आलेल्यांना पण धक्का…

Raj Thackeray : …तेव्हा महाराष्ट्रात सन्नाटा होता, महायुतीच्या विजयावर राज ठाकरेचं मोठं वक्तव्य, निवडून आलेल्यांना पण धक्का…

| Updated on: Oct 15, 2025 | 2:50 PM

विरोधकांनी मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील चुकांवरून निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. डिजिटल याद्या वापरण्याऐवजी जुन्या पद्धतीचा वापर हा एक कट असल्याचा आरोप असून, याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीच्या २३२ जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा का होता, असा प्रश्न उपस्थित केला.

विरोधकांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणुकांच्या मतदार याद्यांवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. राज ठाकरे यांनीही या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील चुका आणि अपूर्णतेकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी निवडणूक आयोगाला उद्देशून, नियमांनुसार मतदार याद्या तपासण्याचा आणि प्रमाणित प्रती मिळवण्याचा अधिकार नागरिकांना असतानाही माहिती दिली जात नसल्याचे नमूद करण्यात आले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २३२ जागा जिंकल्या असल्या तरी, महाराष्ट्रात अपेक्षित जल्लोष न होता सन्नाटा होता याकडे लक्ष वेधले. याला निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि मतदार यादीतील घोळ कारणीभूत असल्याचे त्यांनी सूचित केले. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असून, यावर तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. तर मतदार याद्यांमधील सर्व चुका दुरुस्त केल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने केली.

Published on: Oct 15, 2025 02:49 PM