Mumbai BMC polls : BMC निवडणुकीसाठी मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’बाहेर थेट रेल्वे इंजिन अन्..

| Updated on: Dec 31, 2025 | 1:22 PM

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मनसेचे रेल्वे इंजिन प्रचारासाठी सज्ज झाले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आकर्षक इंजिन तयार करण्यात आले असून, यात सहा ते सात व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था आहे. अवघ्या काही दिवसांत प्रचाराला सुरुवात होणार असून, हे इंजिन प्रचारात सहभागी होणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता जोर धरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर प्रचारासाठी एक विशेष रेल्वे इंजिन सज्ज ठेवण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेने ही अनोखी तयारी केली आहे. शिवतीर्थासमोर हे आकर्षक रेल्वे इंजिन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या इंजिनला पुढे एक केबिन बनवण्यात आली आहे आणि तिच्या पाठीमागे जवळपास सहा ते सात व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मनसेचे हे खास तयार केलेले रेल्वे इंजिन या प्रचाराचा अविभाज्य भाग असणार आहे.

Published on: Dec 31, 2025 01:22 PM