Raj Thackeray : …तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरे यांची भूमिका क्लिअर
राज ठाकरेंनी जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करण्यास घाई नको, अशी भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे सेना आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा पेच अजूनही कायम असून, माहीम, शिवडीसह प्रमुख जागांवर तिढा सुटलेला नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी आघाडीच्या घोषणेला विलंब होत आहे.
राज ठाकरेंनी जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करण्याची घाई करू नये, अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा पेच अजूनही कायम असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी आणि दिंडोशी या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. एकूण 10 ते 15 जागांचा पेच कायम असल्याचे बोलले जात आहे.
मातोश्री आणि शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी, या जागावाटपावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. विशेषतः शिवडीमधील जागावाटपाचा तिढा राज ठाकरे सोडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल शिवडीमधील मनसेचे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवतीर्थावर आले होते. विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकर्त्यांनी शिवडीमध्ये मनसेला दोन जागा सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना हा जागावाटपाचा प्रश्न आघाडीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.