Raj Thackeray : जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका… शिवसेना-मनसे युती अंतिम टप्प्यात अन् राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट सूचना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीच्या जागावाटपाची रस्सीखेच ताणून न धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून, उद्या त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जागावाटपाची प्रक्रिया अनावश्यक ताणून न धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेना-मनसे युतीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या या जागावाटपावर शिक्कामोर्तब होऊन अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राज ठाकरे यांनी हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. राज ठाकरे, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर युतीच्या जागावाटपाचा हा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे.
तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी लावून धरली आहे. कार्यकर्त्यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडली आहे. वरिष्ठ नेते मात्र महायुतीचा भाग म्हणून निवडणूक लढण्यास आग्रही आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीतही फडणवीस आणि गडकरी यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, ज्यामुळे नागपूरमधील भाजपच्या रणनीतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.