ठाकरे बंधूंच्या भेटी आधी काय घडलं? पाहा इनसाईड स्टोरी

ठाकरे बंधूंच्या भेटी आधी काय घडलं? पाहा इनसाईड स्टोरी

| Updated on: Jul 27, 2025 | 1:52 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मराठी मेळाव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात युतीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती, ज्यामुळे युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीमुळे मनसे-शिवसेना युतीच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत.

दरम्यान, राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची कल्पना कोणत्याही नेत्याला नव्हती. सकाळी साधारण 11 वाजेच्या सुमारास मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या फोन करून खासदार संजय राऊत यांना फोन केला. यावेळी मी मातोश्रीवर येत असल्याचं त्यांनी संजय राऊत यांना सांगितलं. यावेळी संजय राऊत सामनाच्या कार्यालयात होते. राज ठाकरेंचा फोन जाताच त्यानंतर सगळ्या घडामोडींना वेग आल्याची माहिती आता समोर आली आहे.

Published on: Jul 27, 2025 01:50 PM