Raj Thackeray : शाळा हिंदी भाषा कशी शिकवते तेच बघतो; राज ठाकरेंचं सरकारला थेट आव्हान

Raj Thackeray : शाळा हिंदी भाषा कशी शिकवते तेच बघतो; राज ठाकरेंचं सरकारला थेट आव्हान

| Updated on: Jun 18, 2025 | 12:35 PM

Raj Thackeray Press Conference : शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला आहे.

हिंदी सक्ती कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ असल्याचा थेट इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबाबत सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापला आहे. शैक्षणिक धोरणातील हिंदी भाषेला मनसेचा विरोध, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज भाषा सक्ती करताय उद्या इतरही फतवे निघतील, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे. तसंच, हिंदीची सक्ती दक्षिणेत कराल का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या पूर्वी देखील हिन्दी भाषेबद्दल मनसेकडून सरकारला 2 पत्र पाठवण्यात आलेली होती. आज याच विषयाबद्दल आणखी एक पत्र राज ठाकरेंनी सरकारला पाठवलं आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रावर तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका. राज्यातील महत्त्वाचे विषय भरकटवण्यासाठी हे सगळं केलं जातंय का? माझी राज्यातील पत्रकारांना, साहित्यिकांना विनंती आहे की त्यांनी या निर्णयाविरोधात कठोर शब्दांत बोलायला हवं. आज हा विषय आपल्यावर लादला गेला तर हे लोक नजिकच्या काळात मराठी भाषेचं अस्तित्त्व ठेवणार नाहीत. प्रत्येक शाळांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध करावा. तसेच हे सरकार व शाळा हिंदी भाषा कशी शिकवतात तेच मी बघतो. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर त्यांनी आव्हान म्हणून घ्यावं. मात्र, राज्यात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही, असं थेट आव्हानचं आता राज ठाकरेंनी दिलं आहे.

Published on: Jun 18, 2025 12:29 PM