Rajesh Tope | कोरोना नियम पाळा, नाहीतर कारवाई होणार : राजेश टोपे

| Updated on: Jan 08, 2022 | 9:12 AM

कोरोना नियमांची खबरदारी न घेतल्यास यापुढे नियमांची कडक अंमलबजावणी होईल.  पोलीस आणि प्रशासनाला कारवाई करण्याचे संगणार तसेच प्रसंगी गुन्हे दाखल करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

Follow us on

अनावश्यक गोष्टी मुळे संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यास पुढील काही कालावधी मध्ये निर्बंध वाढवन्याचा विचार मुख्यमंत्री स्तरावर केला जाऊ शकतो असेही टोपे म्हणाले. रुग्णालयात भरती होण्याचे तसेच ऑक्सिजन वापराचे  प्रमाण वाढले नसून त्यामुळे घाबरण्याच कारण नाही, मात्र या महामारीपासून वॅक्सिंनच वाचवू शकेलं त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अशी आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा विनंती केलीय. पुणे मुंबई तसेच ठाणे मधील पॉझिटिव्हीटी रेट तसेच ओमायक्रोन चा वेग पाहता तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी इतर जिल्ह्यात मात्र अशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा लगेचच निर्णय होणार नसल्याचे टोपे म्हणाले.  कोरोना नियमांची खबरदारी न घेतल्यास यापुढे नियमांची कडक अंमलबजावणी होईल.  पोलीस आणि प्रशासनाला कारवाई करण्याचे संगणार तसेच प्रसंगी गुन्हे दाखल करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.