Raju Shetti : कैद्यांच्या फराळात खाल्ले पैसे… राजू शेट्टींचा IPS सुपेकरांवर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील जेवढे कारागृह आहेत त्यासाठी ज्या वस्तू, राशन खरेदी केलं जातं आहे, त्यात मोठा घोटाळा झाला असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. बघा काय म्हटले राजू शेट्टी?
माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. दिवाळी फराळ म्हणून सुपेकरांनी कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तर दर पत्रक हल्दीरामप्रमाणे मात्र खरेदी लोकल मार्केटमधून केल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलंय. हल्दीराम आणि लोकल मार्केटच्या दरांमध्ये ४० ते ६०टक्के तफावत आहेत. तर दिवाळीमध्ये जवळपास पाच कोटी रूपयांचा फराळ खरेदी केल्याचे शेट्टी यांनी म्हटलंय. यावरून सुपेकरांनी कैद्यांच्या फराळातही पैसे खाल्याचे राजू शेट्टी म्हणालेत. होणाऱ्या घोटाळ्यासंदर्भात मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या दोघांनी मिळून खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे.
Published on: Jun 05, 2025 02:09 PM
