त्या महिलांमध्ये धाडस नव्हत म्हणून..; भाजप नेत्याची पहलगाम हल्ल्यावर मुक्ताफळं
पहलगाम येथे झाकलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणखी एका भाजप नेत्याने वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यावरून आणखी एका भाजपनेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. त्या महिलांमध्ये धाडस नव्हतं म्हणून त्या हात जोडत होत्या. भाजप नेते रामचंद्र जांगरा यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. तर जांगराच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ही टीका केली आहे.
भाजप नेते रामचंद्र जांगरा यांनी म्हंटलं आहे की, या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांच्या अड्ड्यांसह मोठ्या संख्येने दहशतवादी आणि त्यांचे मालक मारले गेले आहेत. मात्र जर पहलगाम हल्ल्यादरम्यान महिला पर्यटकाने देवी अहिल्याबाईंप्रमाणे लढा दिला असता तर या दहशतवादी घटनेत केवळ दहशतवादी मारले गेले नसते तर भारतीय नागरिकांचे जीवितहानी देखील कमी झाली असती, अशी मुक्ताफळं जांगरा यांनी वाहिली आहेत.
