Ramdas Kadam : ‘मी तोंड उघडलं तर मातोश्री कापेल, शरद पवार स्वतः म्हणाले बाळासाहेबांच्या बॉडीला का त्रास देतोय उद्धव!’

Ramdas Kadam : ‘मी तोंड उघडलं तर मातोश्री कापेल, शरद पवार स्वतः म्हणाले बाळासाहेबांच्या बॉडीला का त्रास देतोय उद्धव!’

| Updated on: Oct 03, 2025 | 5:30 PM

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत, "मी तोंड उघडल्यास मातोश्री हादरून जाईल," असे वक्तव्य केले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या क्षणांबाबत उद्धव यांनी केलेले पाप उघड करण्याची धमकी देत, कदम यांनी बाळासाहेबांच्या हाताच्या ठशांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत गंभीर आरोप केले आहेत. “मी तोंड उघडलं तर मातोश्री कापेल, हादरा बसेल,” असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरच्या काही घटनांवरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी पाप केल्याचा दावा केला. शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, रामदास कदम यांनी बाळासाहेबांचे हाताचे ठसे घेतल्याचा आणि त्याचे पुढे काय केले, याबद्दल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाला शपथ घेऊन सांगण्याचे आव्हान दिले. आपण अजून अनेक गोष्टी बोललो नसून, वेळ आल्यास त्या समोर आणणार असल्याचेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

Published on: Oct 03, 2025 05:29 PM