Ramdas Kadam Exclusive | कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदम यांचं TV9 मराठीकडे स्पष्टीकरण
कदम यांनी हे आरोप फेटाळले आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता.
मुंबई: शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम अचानक पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत. कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले आहेत. कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांकडे रसद पुरवल्याचं या क्लिपमधून स्पष्ट दिसत आहे. कदम यांनी हे आरोप फेटाळले आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा टाकलेला आहे. प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे.
