दाऊदच्या माणसाला साथ दिल्याने सेनेचा रंग फिका पडला : Raosaheb Danve
आमचा रंग ओरिजिनल आहे, रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं, शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्ह त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी आता त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावं, असं दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी. पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत पण शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. आमचा रंग ओरिजिनल आहे, रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं, शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्ह त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
