Special Report | रावसाहेब दानवे राहुल गांधींवर घसरले, काँग्रेस नेते भडकले!
सांड बैल म्हणजे न काम करणारा. सांडचा अर्थ यांनी जो कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास केला असेल, तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकण्यासाठी कुणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्यांचा जुना धंदा आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या खुमासदार भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जन-आशीर्वाद यात्रेत बोलताना मात्र दानवे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दानवे यांनी त्यांना थेट सांड अशी उपमा देऊन टाकली. त्यावरुन काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलंय. (Raosaheb Danve’s tongue slipped again!)
Published on: Aug 22, 2021 11:15 PM
