Special Report | फडणवीसांच्या बंगल्याला वॉशिंग मशीन कुणी म्हटलं?

| Updated on: Aug 18, 2022 | 11:27 PM

प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसूळ या नेत्यांवर गंभीर आरोप झाले. पण सध्या हेच नेते भाजपसोबत सत्तेत आहेत. यांच्यामागचा केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिराही कमी झालाय. त्यामुळं शिवसेना नेत्यांनी भाजपकडे वॉशिंग मशीन असल्याची टीका केलीय.

Follow us on

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात(phone tapping case) ज्यांच्यावर आरोप झाले. फोन टॅपिंग प्रकरणात ज्यांची चौकशी झाली. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल असलेल्या चार्जशीटमध्ये ज्यांचं नाव आहे. त्या रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) बंगल्यावर पोहोचल्या. याच विषयावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला मारला. 2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले गेले. संजय राऊतांचा फोन एस रहाटे तर एकनाथ खडसेंचा फोन खडासने या नावानं टॅप करण्यात आला. हे दोघं समाजविघातक कृत्ये करत असल्यानं त्यांचा फोन टॅप होत असल्याचं भासवण्यात आलं. संजय राऊतांचा फोन 60 दिवस तर एकनाथ खडसेंचा फोन 67 दिवस टॅप करण्यात आला. हे सर्व रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरुनच झाल्याचा आरोप आहे. मविआ सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली. आणि रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ झाली. पण राज्यात सत्ताबदल झाला..आणि रश्मी शुक्ला थेट फडणवीसांच्या बंगल्यावर पोहोचल्या. त्यामुळं विरोधकांनी टीका केलीय. बाळासाहेब थोरातांनी तर फड़णवीसांच्या सागर बंगल्यालाच वॉशिंग मशीन असं संबोधलं. मविआ सरकारच्या काळात किरीट सोमय्यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले होते.

प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसूळ या नेत्यांवर गंभीर आरोप झाले. पण सध्या हेच नेते भाजपसोबत सत्तेत आहेत. यांच्यामागचा केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिराही कमी झालाय. त्यामुळं शिवसेना नेत्यांनी भाजपकडे वॉशिंग मशीन असल्याची टीका केलीय.

किरीट सोमय्यांनी आरोप केलेले जे जे नेते शिंदे गटात गेले त्यांच्यामागचा चौकशीचा ससेमिरा जवळपास संपलाय. आता रश्मी शुक्लांनी फड़णवीसांची भेट घेतलीय. त्यामुळं रश्मी शुक्लांच्या प्रकरणाचं काय होणार हे बघावं लागेल.