VIDEO : Ratnagiri Rain | चिपळूणमधील स्वर संकुल विहार बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली

VIDEO : Ratnagiri Rain | चिपळूणमधील स्वर संकुल विहार बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली

| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 12:41 PM

वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.

चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगर मधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत.