राजकीय वर्तुळात खळबळ! खडसेंचे जावई रेव्ह पार्टीत रमले; पुणे पोलिसांची कारवाई

राजकीय वर्तुळात खळबळ! खडसेंचे जावई रेव्ह पार्टीत रमले; पुणे पोलिसांची कारवाई

| Updated on: Jul 27, 2025 | 10:49 AM

पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू भागात रात्री उशिरा पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापेमारी केली आहे.

पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू भागात रात्री उशिरा पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापेमारी केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा या पार्टीत सहभाग होता. पोलिसांनी तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केल्यामुळे ही छापेमारी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

खराडी, ज्याची पुण्यात उच्चभ्रू भाग म्हणून ओळख आहे, तिथे एका निवासस्थानी रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला आणि काही महिला व पुरुषांना ताब्यात घेतले. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आरोप केला आहे की, या रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनीच केले होते.

Published on: Jul 27, 2025 10:47 AM