Ravindra Chavan | ‘नाशिक महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचाच होणार’
महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. प्रदीर्घ काळानंतर या निवडणुका होत आहेत.कालावधी फार कमी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि संघटनात्मक सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज नाही नाशिक, मालेगाव त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामधला हा प्रवास आहे.
महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. प्रदीर्घ काळानंतर या निवडणुका होत आहेत.कालावधी फार कमी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि संघटनात्मक सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज नाही नाशिक, मालेगाव त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामधला हा प्रवास आहे. अर्ज मागे घेणे या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून प्रत्यक्षात प्रचाराला सुरवात झाल्याचे दिसून येते. भाजपचे आमचे सर्व पदाधिकारी सरचिटणीस असतील जिल्ह्याचे अध्यक्ष असतील या सगळ्यांना प्रभागनिहाय निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायचं आहे ह्या संधर्भात चर्चा करण्यासाठी आजची बैठक आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जोरात सुरुवात झाली पाहिजे अशी रचना तयार करण्यासाठी भाजपचे रवींद्र चव्हाण नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. नाशिक महानगरपालिकेमध्ये गतिमान पद्धतीने तिथला विकास कोणती पार्टी करू शकते याची चर्चा होणं आवश्यक आहे, असं वक्तव्य रविंद्र चव्हाणांनी केलं आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नाशिक महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचाच होईल असं देखील चव्हाण म्हणाले.
