Raza Academy | राज्य सरकारच्या वंदे मातरम् म्हणण्याच्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध

| Updated on: Aug 15, 2022 | 8:31 PM

रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी(Raza Academy President Saeed Noori) यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.  आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. म्हणून त्या ऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल असे रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी म्हणाले.

Follow us on

चंद्रपूर : शासकीय कर्मचारी फोनवर हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम(Vande Mataram) बोलणार आहेत. सरकार तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर रझा अकादमी(Raza Akademi) यांनी विरोध दर्शविला आहे. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी(Raza Academy President Saeed Noori) यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.  आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. म्हणून त्या ऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल असे रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी म्हणाले. या बाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.  वंदे मातरम प्रकरणावर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंदे मातरमवर व्यक्त होण्याचा रझा अकादमीला जसा अधिकार आहे तसाच देशप्रेमी नागरिकांना वंदे मातरम म्हणण्याचाही अधिकार असल्याचे मत त्यांनी मांडले. देशप्रेमी नागरिकांचा अधिकार रजा अकादमी कसा नाकारू शकते? सवाल त्यांनी विचारला आहे.