Bengaluru News : पोलिसांचा लाठीचार्ज अन् चेंगराचेंगरी; काही क्षणात विजयोत्सवावर फिरलं विजरण
RCB Celebration News Update : बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या आरसीबीच्या विजयाच्या रॅली आणि सत्कार सोहळ्यात चेंगराचेंगरी झालेली असल्याने यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
आयपीएल २०२५ चॅम्पियन आरसीबीच्या स्वागतासाठी एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी जमली असतानाच झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी गेट उघडताच चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या संपूर्ण घटनेत 10 जणांनी जीव गमावला आहे तर 20 जण जखमी झालेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर इतकी गर्दी होती की चाहते भिंतीवरून उडी मारून आत जात होते. अनेक दृश्यांमध्ये असे दिसून आले की चाहते झाडांवर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. ही चेंगराचेंगरी स्टेडियमच्या गेट क्रमांक १ जवळ झाली आहे. स्टेडियममध्ये पोहोचण्यापूर्वी आरसीबीचे खेळाडू विधानसभेत पोहोचले होते. जिथे मुख्यमंत्र्यांनी सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर, खेळाडूंची टीम बस चिन्नास्वामी स्टेडियमकडे रवाना झाली. ही चेंगराचेंगरी झाली त्यावेळी आरसीबीची टीम या स्टेडियमवर उपस्थित नव्हती. मात्र 18 वर्षांनी मिळालेल्या या विजयाच्या आनंदाला लागलेल्या गालबोटाने हा आनंद 24 तासांसाठी देखील टिकू शकलेला नाही.
