VIDEO : Pankaja Munde LIVE | तुमचे सर्वांचे राजीनामे नामंजूर करते, पंकजा मुंडेंच पदाधिकाऱ्यांना आवाहन

VIDEO : Pankaja Munde LIVE | तुमचे सर्वांचे राजीनामे नामंजूर करते, पंकजा मुंडेंच पदाधिकाऱ्यांना आवाहन

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 2:50 PM

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला.

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवालही त्यांनी केला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us