Puratawn : ‘कदाचित ‘पुरातन’ हा शर्मिला टागोर यांचा अखेरचा चित्रपट…’ रितुपर्णासह इंद्रनील सेनगुप्ताचं प्रेक्षकांना मोठं आवाहन

Puratawn : ‘कदाचित ‘पुरातन’ हा शर्मिला टागोर यांचा अखेरचा चित्रपट…’ रितुपर्णासह इंद्रनील सेनगुप्ताचं प्रेक्षकांना मोठं आवाहन

| Updated on: Apr 19, 2025 | 11:48 AM

दिग्दर्शन सुमन घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या पुरातन या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासह रितुपर्णा सेनगुप्ता, इंद्रनील सेनगुप्ता यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.

दिग्दर्शन सुमन घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या पुरातन या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी काम केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्या अभिनयाकडे लागल्या आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी पुरातन या बंगाली चित्रपटाच्या माध्यमातून एन्ट्री घेतली असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमीअर झाला. यावेळी अनेक दिग्गज कलाकर हजर होते. ‘शर्मिला टागोर आजच्या कार्यक्रमास उपस्थित असत्या तर फारच छान झाले असते. मात्र त्यांनी आमच्यासोबत या चित्रपटात काम केले हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बंगालमध्ये हा चित्रपट अगोदरच हिट झाला तर आज हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे.’, असं निर्मात्या रितुपर्णा सेनगुप्ता यांनी म्हटलंय. तर पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला आहे. बंगालमध्ये या चित्रपटाला फारच चांगला प्रतिसाद असून मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई येथून प्रेक्षकांनी कौतुक केले असं म्हणत अभिनेता इंद्रनील सेनगुप्ताने प्रेक्षकांना हे चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

Published on: Apr 19, 2025 11:48 AM