Sushma Andhare Vs Navnath Ban | हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, सुषमा अंधारे आणि नवनाथ बन यांच्यात जुंपली
महाराष्ट्र कोणीही हिरवा करू शकत नाही. औरंगजेब आणि अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला, त्याने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे. इथे असे कितीही औरंगजेबचे फॅन क्लब येऊन मुंबईत बोंबलत बसले कि महाराष्ट्र हिरवा करू तर, ते कधीच होणार नाही.
भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमआयएमचा (MIM) आहे का?, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. भाजप आणि एमआयएमने अचलपूर (अमरावती) येथे केलेल्या कथित युतीबाबत अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवण्याबाबत वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आपले मत मांडले. त्यांनी म्हटले की, इम्तियाज जलील यांचा व्यक्ती म्हणून मला आदर आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये, विशेषतः अचलपूरमध्ये एमआयएमसोबत केलेल्या युतीबाबत भाजपला स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. भाजपच्या झेंड्यामध्ये वर भगवा आणि खाली हिरवा रंग असतो. अंधारे यांनी विचारले की, हा हिरवा रंग एमआयएमचा आहे का? तसेच, भाजपच्या भगव्या कमळाचा जो हिरवा देठ आहे, तो एमआयएम आहे का? असे प्रश्न विचारून त्यांनी भाजपच्या दुहेरी भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.
सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन हे स्पष्टीकरण देत म्हणाले, महाराष्ट्र कोणीही हिरवा करू शकत नाही. औरंगजेब आणि अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला, त्याने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे. इथे असे कितीही औरंगजेबचे फॅन क्लब येऊन मुंबईत बोंबलत बसले कि महाराष्ट्र हिरवा करू तर, ते कधीच होणार नाही. इथे औरंगजेबाचा उदो उदो चालणार नाही इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार चालेल हे इम्तियाज जलील यांनी ध्यानात ठेवावं.
