Chitra Wagh | रुपाली चाकणकरांना उद्देशून माझ ट्वीट नव्हतं; चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण

Chitra Wagh | रुपाली चाकणकरांना उद्देशून माझ ट्वीट नव्हतं; चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण

| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 6:57 PM

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे. “माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

आज अगदी सकाळी ट्विट करुन चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांंच्यावर शरसंधान साधलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार त्यांनी केला. त्यानंतर रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.