Russia Plane Crash : रशियात अहमदाबादची पुनरावृत्ती, विमान दुर्घटनेत सर्वच प्रवाशांचा मृत्यू; कारण नेमकं काय?

Russia Plane Crash : रशियात अहमदाबादची पुनरावृत्ती, विमान दुर्घटनेत सर्वच प्रवाशांचा मृत्यू; कारण नेमकं काय?

| Updated on: Jul 24, 2025 | 5:01 PM

गुरुवारी (२४ जुलै) रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एएन-२४ प्रवासी विमानाशी रशियन एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) चा संपर्क तुटला. या घटनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रशियाच्या अंगारा एअरलाइन्सच्या एका प्रवासी विमान अपघाताची मोठी माहिती समोर आली आहे. रशिया-चीन सीमेवर बेपत्ता झालेले रशियन विमान कोसळलं होतं. विमान लँड झाल्यानंतर त्याच्या इच्छित स्थळीपोहचण्यापूर्वी विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी (ATC) संपर्क तुटला होता. या अपघातात विमानातील सर्व 50 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमान कोसळले आणि आग लागली. बचावकर्त्यांना आग लागलेल्या अवस्थेतील अवशेष सापडले. रशियन नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. काही काळापूर्वी, स्थानिक रशियन अधिकाऱ्याने बेपत्ता विमानाबद्दल माहिती दिली होती.

पूर्व अमूर प्रदेशात रशियन हवाई वाहतूक नियंत्रणाचा विमानाशी संपर्क तुटला. हा परिसर रशिया आणि चीनच्या सीमेवर आहे. अंगारा एअरलाइन्सचे हे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते.  चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ येताना विमान एटीसी रडार स्क्रीनवरून गायब झाले. बेपत्ता विमान सायबेरियास्थित अंगारा एअरलाइन्सचे अँटोनोव्ह-24 विमान होते.

Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

Published on: Jul 24, 2025 05:00 PM