Russia Ukraine crisis | Russia च्या रणगाड्यांमधून बुचा शहरात तोफगोळ्याचा भडीमार

Russia Ukraine crisis | Russia च्या रणगाड्यांमधून बुचा शहरात तोफगोळ्याचा भडीमार

| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 4:12 PM

रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine War) सुरू केलेला हल्ला अजूनही थांबलेला नाही. काल रात्रभर युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आज सकाळीही जोरदार हल्ले करण्यात आले. आज चौथ्या दिवशी रशियाने युक्रेनवर प्रचंड मोठा मिसाईल हल्ला केला.

रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine War) सुरू केलेला हल्ला अजूनही थांबलेला नाही. काल रात्रभर युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आज सकाळीही जोरदार हल्ले करण्यात आले. आज चौथ्या दिवशी रशियाने युक्रेनवर प्रचंड मोठा मिसाईल हल्ला केला. रशियाने युक्रेनची खारकीव गॅस पाईपलाईन (gas pipeline) उडवून दिली आहे. तसेच वासिली कीव आईल टर्मिनल (Oil Terminal) उडवून दिला आहे. आईल टर्मिनल उडवून देताच सर्वत्र आगीडोंब उसळला आहे. संपूर्ण अवकाशात धुराचे लोट पसरले. सर्वत्र विषारी वायु पसरल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. आगीचे तांडव आणि धुराचे लोट यामुळे अनेकांना श्वसनाचाही त्रास होत आहे. या शिवाय आईट टर्मिनल परिसरात जाण्यापासून अनेकांना मज्जाव करण्यात आला आहे. ऑईल टर्मिनल उडवून दिल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यातून या हल्ल्याची भीषणता आणि दाहकता दिसून येत आहे.

Published on: Feb 27, 2022 04:12 PM