Saamana : ‘बेईमानी’चा विजय, निवडणूक आयोग लोकशाहीचे थडगं खणतंय; बिहार निकालावरून ‘सामना’तून रोखठोक टीका
सामनाने बिहार निवडणुकांवरून लोकशाही वाचवण्यासाठी बहिष्काराचा सूर लावला आहे. मुंबईत वर्षा गायकवाड यांनी अमित साटम यांच्यावर हिंदू-मुस्लिम वाद भडकावल्याचा आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांना दरिंदा संबोधत जातीपातीचे राजकारण करत असल्याचा दावा केला, ज्याला भाजपने तीव्र प्रत्युत्तर दिले.
राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सामना वृत्तपत्राने बिहारमधील निवडणूक निकालांवरून निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली आहे. बिहारमध्ये जनादेश नसून निवडणूक आयुक्तांचा जनादेश असल्याची टीका सामनाने केली आहे. निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत यावर सगळ्यांचेच एकमत होते, असे सामनाने नमूद केले. लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतो. बहिष्कार टाकून भारतातील हुकूमशाहीकडे जगाचे लक्ष वेधावे लागेल, असा घणाघात सामनाने केला आहे.
बिहारात भाजप वगैरेचा विजय होऊनही विजयी जल्लोष दिसला नाही. महाराष्ट्रात भाजप जिंकूनही कुठे आनंदोत्सव दिसला नाही. कारण या
निकालांवर कोणाचाच विश्वास नाही. हा ‘जनादेश’ नसून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारचा जनादेश आहे, असे उघडपणे बोलले जाते. निवडणूक आयोगाची बेइमानी लोकशाहीचे थडगे खणत आहे, असं सामनातून म्हटले आहे.
