Ambadas Danve : सरकारने वादा खिलाफी केली आहे, अंबादास दानवेंची टीका
Sambhajinagar Tractor Morcha : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. महायुतीने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नसल्याने क्या हुआ तेरा वादा म्हणत सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाने हा मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा ट्रॅक्टर मोर्चा आज काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरच्या रांगा रस्त्यावर बघायला मिळाल्या. यावेळी प्रत्येक ट्रॅक्टरवर महायुतीने केलेल्या घोषणा आणि त्या खाली क्या हुआ तेरा वादा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले बघायला मिळाले.
यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितलं की, महायुतीने केलेल्या घोषणा या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसह अनेक आश्वासने दिली होती. पण यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
