Kalyan | घामाने माखलेल्या मांडीवर ठेवले समोशाचे पीठ, काटेमानिवली परिसरातील घटना

| Updated on: Oct 18, 2021 | 4:15 PM

समोशाचे पीठ घमाने माखलेल्या मांडीवर ठेवून मळले जात असल्याचा धक्कादायक व्हीडीओ कल्याणमध्ये समोर आला आहे. कल्याणच्या काटेमानिवली चौकातील शंकर हॉटेलमध्ये अशा प्रकारे समोसे तयार केले जात होते. हा व्हीडीओ समोर आल्यावर पुन्हा एकदा नागरीकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे उघड झाले आहे. 

Follow us on

कल्याण पूर्व भागात राहणारे भूषण पवार हे मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आहे. रविवारी त्यांच्या समितीची एक बैठक होती. या बैठकीसाठी भूषण यांनी काटमानिवली परिसरातील शंकर हॉटेलला समोशाची ऑर्डर दिली होती. समोसे घेण्यासाठी ते दुकानात गेले असता त्यांनी पाहिले की, दुकानातील दोन कर्मचारी त्याठीकाणी समोसे तयार करीत होते. समोसे तयार करण्यासाठी जे पीठ मिळले जात होते. ते चक्क घामाने माखलेल्या मांडीवर  मळले जात होते. हा प्रकार पाहताच भूषण यांनी व्हीडीओ काढला. या प्रकरणात  प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी भूषण यांनी केली आहे. मात्र ज्या प्रकारे पीठ मळल जात होते. नागरीकांच्या आरोग्याला धोका आहे. प्रशासनाने त्वरीत या दुकानावर कारवाई करुन अन्य दुकानांचीही तपासणी केली पाहिजे अशी मागणी जोर धरु लागली आहे.