‘…तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईल’ – Sandeep Deshpande

‘…तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईल’ – Sandeep Deshpande

| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 3:17 PM

Sandeep Deshpande: आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईल, असं सांगतानाच आम्ही दोषी होतो तर त्या महिला पोलिसांना रजेवर का पाठवलं? त्यांना सक्तीची रजा का दिली?

मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनात महिला पोलिसांना धक्का लागल्यानंतर मनसेचे (mns) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी हे गायब झाले होते. मात्र, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही महिला पोलिसांना धक्का दिला नाही. आमच्या धक्क्याने महिला पोलीस जमिनीवर कोसळल्या नाहीत. महिला पोलिसांना आम्ही धक्का दिल्याचं एक तरी फुटेज दाखवल्यास मी आताच राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Published on: May 20, 2022 03:17 PM