Sangli Yellamma Yatra : उदे गं आई उदे उदे… सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर

| Updated on: Dec 12, 2025 | 5:59 PM

सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील बेळंकी येथील श्री यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर पाहायला मिळाला.

सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील बेळंकी येथील 350 वर्षाची परंपरा असलेली श्री यल्लमा देवीची यात्रा मोठया उत्साहासह भक्तीभावात संपन्न झाली. यात्रेच्या मुख्य दिवशी सायंकाळी देवीच्या पालखीची पाच प्रदक्षिणा काढण्यात आल्या. पालखीसोबत देवीचे सर्व पुजारी पालखीचे मानकरी आणि देवीचे मानाचे जग घेतलेल्या व्यक्ती यांचा समावेश होता. तसेच पारंपरिक वाद्याच्या निनादात पालखीची फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले लाखो भाविकांनी उदे गं आई उदेच्या गजरात पालखीवर भंडारा आणि मोती पोवळ्याची उधळण करून पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. पालखी प्रदक्षिणा सोहळ्यानंतर सूर्यास्तावेळी कीच पडणे हा धार्मिक आणि पारंपारिक कार्यक्रम संपन्न झाला. यात्रेमध्ये सर्व यात्रेकरूंसाठी आणि भाविक भक्तांसाठी लाईट, पाणी, आरोग्य, इत्यादी सर्व सेवा यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published on: Dec 12, 2025 05:57 PM