Sangram Thopate : संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्…, पुढची भूमिका काय?

Sangram Thopate : संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्…, पुढची भूमिका काय?

| Updated on: Apr 19, 2025 | 12:36 PM

संग्राम थोपटे हे तीन वेळा पुणे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यांनी आपल्या फेसबूकवरील कव्हर फोटो बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळतंय

गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे लवकरच काँग्रसेला रामराम करत भाजपता प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांचा भाजपातील प्रवेश जवळपास निश्चित झाला असून भाजपा प्रवेशासंदर्भात संग्राम थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सोमवारी बैठकही झाली. अशातच संग्राम थोपटे यांच्याकडून काँग्रेसला रामराम ठोकण्याचे संकेत देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. संग्राम थोपटे यांनी आपल्या फेसबूक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदलल्याचे दिसतंय. संग्राम थोपटे यांनी फेसबूक प्रोफाईलवरील कव्हर फोटोवर असलेलं काँग्रेस पक्षाचं चिन्ह काढून नवा फोटो अपलोट केला आहे. या नव्या फोटोमध्ये फक्त संग्राम थोपटे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून केवळ त्यांच्याच फोटो दिसतोय. यावरून संग्राम थोपटे हे निश्चितपणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे दिसतंय.

Published on: Apr 19, 2025 12:36 PM