Sanjay Raut : सोनिय गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका, तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप

| Updated on: Jul 22, 2022 | 11:34 AM

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांची संपत्ती ईडीने जप्त केली. शिवसेना नेते संजय राऊत यांना स्वत:लाही ईडीने समन्स बजावलं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. 

Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केलाय. ‘केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करतात ते सर्वांना माहीत आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष देश हितासाठी प्रश्न विचारत आहोत. सातत्याने अन्यायाविरोधात आवाज उठवत आहोत. पण आमचा आवाज दाबण्यासाठी चौकशी होत आहे. सोनिय गांधी, राहुल गांधी किंवा मी कोणी असो जो सवाल विचारेल. त्याला धमकावलं जातंय. दबाव आणला जातोय, तुरुंगात टाकलं जाण्याची धमकी दिली जातेय. पण आम्ही या सर्वासाठी तयार आहोत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची काल ईडीकडून (ED) चौकशी झाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती ईडीने जप्त केली. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांना स्वत:लाही ईडीने समन्स बजावलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.