भाजप आता अजित पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ
भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला फोडणार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राऊतांच्या या दाव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधत मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेना-राष्ट्रवादी सारखं भाजप अजित पवार आणि शिंदे गटाला फोडणार असा खळबळजनक दावा केला. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यानंतर शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी राऊतांवर पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘संजय राऊत यांचे बालिशचाळे, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असं उदय सामंत म्हणाले. तर शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही संजय राऊतांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप संदर्भातील अनुभव चांगला असल्याचे म्हणत आमचा चांगला संबंध आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य करत मोठा दावा करत निशाणा साधलाय. तर रवी राणांच्या दाव्यानंतर संजय राऊतांनी राणांना खोचक टोला लगावला आहे. यादरम्यान, गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारलं यावर स्पष्टीकरण देत एक किस्सा सांगितला. मात्र यानंतर संजय राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
