बार्ज पी 305 वरील कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार: संजय राऊत
Four Minute Twenty Four Headlines

बार्ज पी 305 वरील कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार: संजय राऊत

| Updated on: May 22, 2021 | 4:02 PM

बार्ज पी 305 दुर्घटनेवरुन राजकारण रंगलं आहे.

मुंबई: तोक्ते चक्रीवादळादरम्यान बुडालेल्या बार्ज पी 305 बुडाल्यावरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार असल्याचा आरोप केला. तर, वादळाची कल्पना असताना कामगारांना वाऱ्यावर का सोडलं, असं देखील राऊत म्हणाले. तर, दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी बार्ज दुर्घटनेचं महाविकास आघाडी सरकारचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप केला.