Sanjay Raut : राणे भाजपचे आश्रित, त्यांच्या टोपाचे केसही पिकलेत जरा भान…राऊतांचा जिव्हारी लागणारा पटलवार
'उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:चे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा. फक्त स्वत:च्या पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका. हे सुद्धा आकडे मोजा. आणि जी लढाई निवडणुकीत झाली नाही त्यातला हा विजय आहे. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्यांनी पाय खेचले. त्यांच्या शौर्याचे पोवाडे राणेंनी गाऊ नये. '
‘राज आणि उद्धव हा जर फॉर्म्युला असेल तर त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा. दोन्ही भावांची ताकद काय आहे. एकाकडे शून्य तर दुसर्याकडे 20 आमदार… करा प्लस. किती होतात पाहा. यांच्या युतीने फरक पडणार नाही’, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. यावर राऊतांनी पलटवार केलाय. पाकिस्तानात कुणाला पाठवायचं हे भविष्यात ठरवू. मोदींनी पाकिस्तानविरोधात मोदींनी दंड भरले होते ते पिचके आहेत का? प्रेसिडंट ट्रम्पने दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या सैन्याला माघारी का बोलावलं? हे राणेंनी स्पष्ट करावं, असं आव्हानच संजय राऊतांनी भाजप आणि राणेंना दिलं. राज ठाकरे यांचा स्वत:चा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष. तुम्ही भाजपचे आश्रित आहात, असं राऊतांनी म्हटलंय.
तर ऑपरेशन सिंदूर चालवलं. पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणार अशी गर्जना मोदी आणि भाजपने केली त्याचं काय झालं? याचं उत्तर राणेंनी द्यावं. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना? आम्ही नाही गेलो पाकिस्तानात. मोदीच नवाज शरीफचा केक कापायला पाकिस्तानात गेले होते. नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं तर मोदी गेले मिस्टर राणे, असं म्हणत खोचक टिका राऊतांनी केली. राणेंनी आपल्या वयाचं भान ठेवावं. आपलं वय झालं. आपल्या टोपाचे केसही पिकलेत. याचं त्यांनी भान ठेवावं. आणि प्रगल्भ वक्तव्य करावं. तुम्ही कोण आहात. तुम्ही भाजपचे आश्रित आहात. तुम्ही स्वत:चा पक्ष काढून दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं.
