बीएमसी निवडणुकीच्या रणनीतीवर भाजपची बैठक; संजय राऊत म्हणतात, “आधी निवडणुका घ्या…”

| Updated on: Jun 04, 2023 | 11:44 AM

भाजपचे बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सर्व आमदार-खासदारांची तातडीची बैठक बोलावली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, खासदारांनी सूचना दिल्या आहेत.

Follow us on

मुंबई : भाजपचे बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सर्व आमदार-खासदारांची तातडीची बैठक बोलावली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, खासदारांनी सूचना दिल्या आहेत. कामं लोकांपर्यंत पोहोचवा अशी सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 50-50 खोके देऊन सरकार पाडण्याचं कामच फक्त वेगाने झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच आधी निवडणुका घ्या, मग कामं दाखवा, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.