राऊतांच्या तपासात अनेक प्रकरणं समोर येतील
सोमय्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून त्यांना आता ईडी म्हणडे काय याचा अर्थ कळेस असं ही त्यांनी सांगितेल.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वत्र हीच चर्चा करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या अटकेबद्दल किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, संजय राऊत यांना आता नवाब मलिकांशेजारीच रहावं लागणार आहे. ईडीकडून त्यांची दुबईची ट्रीपचीही चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. ते म्हणाले की, त्या ट्रीममध्ये संजय राऊत यांना कोण भेटले व्यवहार काय झाले त्याची चौकशी केली गेली तर 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आणखी माहिती बाहे पडू शकते असंही सोमय्यांनी सांगितले. यावेळी सोमय्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून त्यांना आता ईडी म्हणडे काय याचा अर्थ कळेस असं ही त्यांनी सांगितेल.
Published on: Aug 01, 2022 10:34 AM
