Sanjay Raut : भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं – संजय राऊत

Sanjay Raut : भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं – संजय राऊत

| Updated on: Apr 16, 2025 | 11:37 AM

Sanjay Raut On BJP : शिवसेना उबाठा गटाचे नाशिकमध्ये अधिवेशन आज होत आहे. त्यापूर्वी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली. 

बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला कमळाबाई नाव दिलं. त्यामुळे त्यांचा कोणाला त्रास होण्याचा काहीही संबंध नाही, असं खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे. नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाचे अधिवेशन आज होत आहे. त्यापूर्वी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, आम्हाला सोडून गेलेल्यांना आम्ही हुजरेगिरी करताना पाहत आहोत. उदय सामंत शिवसेनेमध्ये कधी आणि का आले होते? असा प्रश्न त्यांना विचारा, असं म्हणत राऊतांनी सामंत यांच्यावर टोला लगावला आहे. सामंत हे व्यापारी आहेत आणि पैसे कमविण्यासाठी राजकारणात आले. सत्ता गेली म्हणून ते या पक्षातून त्या पक्षात जातात. तुम्ही मूळ शिवसैनिक आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उदय सामंत यांना विचारला आहे. बाकी वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला कमळाबाई हे नाव दिले होते. आपल्याकडे बारस करण्याची पद्धत आहे. तेव्हा नाव ठेवलं जातं. बाळासाहेबांनी देखील भर सभेत भाजपला कमळाबाई नावं दिलं होतं. त्यामुळे त्यांचा कोणाला त्रास होण्याचा काहीही संबंध नाही, असंही राऊत म्हणाले.

Published on: Apr 16, 2025 10:25 AM