Sanjay Raut | कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह

Sanjay Raut | कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह

| Updated on: Mar 07, 2026 | 12:07 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याची घोषणा, तसेच शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. सरकारने विविध योजनांसाठीही मोठ्या घोषणा केल्या. सत्ताधारी पक्षाकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधकांनी मात्र त्यावर टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याची घोषणा, तसेच शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. सरकारने विविध योजनांसाठीही मोठ्या घोषणा केल्या. सत्ताधारी पक्षाकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधकांनी मात्र त्यावर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, हा अर्थसंकल्प ठेकेदारांचे हित लक्षात घेऊन मांडलेला दिसतो. मात्र शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफी मिळणार असेल, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात असल्याचेही त्यांनी सांगितले. राऊत यांनी सांगितले की, आखाती भागातील युद्ध आणि इराणमधील परिस्थितीमुळे भारतातून जाणारा माल दुबईसह इतर बंदरांवर अनेक दिवस अडकून पडला आहे. त्यामुळे शेतमाल खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळेही शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असतानाच ते सरकार पाडण्यात आले, असेही राऊत यांनी सांगितले. आता नव्या सरकारवर ही जबाबदारी आहे. त्यामुळे जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळते का, हे पाहावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Published on: Mar 07, 2026 12:07 PM
Follow Us