Sanjay Raut : सब साथ है, फिर भी..भास्कर जाधवांच्या स्टेटसवर राऊतांना टोला; म्हणाले, इंटरेस्टिंग…
सध्या ठाकरे गटात भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा होताना दिसताय. अशातच दोन वेळा भास्कर जाधवांनी आपली खदखद बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी स्टेटसच्या माध्यमातून पक्षातील लोकांनाच इशारा दिला. यावर संजय राऊतांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.
भास्कर जाधव यांनी स्टेटसला ठेवलेली वाक्ये ही इंटरेस्टिंग असल्याचे संजय राऊत म्हणाले. भास्कर जाधव यांनी आपल्या पक्षातील लोकांनाच सूचक स्टेटस ठेवत इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांच्याकडून खोचक भाष्य करत भास्कर जाधव यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत पुढे असेही म्हणाले, भास्कर जाधव यांची भाषा अतिशय वैभवशाली आहे. पूर्वीचे साहित्यिक असं अलंकारिक लिखाण करायचे. इतकंच नाहीतर हा टोला लगावताना भास्कर जाधवांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली पाहिजे, असा सल्लाही संजय राऊत यांनी भास्कर जाधवांना दिला. ‘वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या…वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे’, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर दिवा जळतानाच तुपाची गरज असते, दिवा विझल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही, असंही भास्कर जाधव यांनी स्टेटसमधून म्हटलं होतं.
