Sanjay Raut LIVE | शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही : संजय राऊत

Sanjay Raut LIVE | शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 10:59 AM

देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट यावर भाष्य केलं. शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असही राऊत म्हणाले. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा देखील हा विषय समोर आला होता.देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.