Sanjay Raut : गिरीश महाजन मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री; राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Raut : गिरीश महाजन मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री; राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Jun 04, 2025 | 12:04 PM

खासदार संजय राऊत यांनी आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळावर ताशेरे ओढले असून गिरीश महाजन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू-संतांचं महामंडळ तयार केलं आहे, त्यातले एक गिरीश महाजन आहे, अशीही टीका यावेळी राऊतांनी केली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने काल गिरीश महाजन अनेक साधूसंतांच्या पाया पडत होते. पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे व प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडले पाहिजे. या सर्वांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. अन्यथा त्यांची तपश्चर्या कधीच पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. मी पुढील काही सांगत नाही. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर आहे. तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत, असा मोठा दावा देखील राऊत यांनी आज केला आहे.

Published on: Jun 04, 2025 12:04 PM