Saamana Editorial Video : ‘गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी…’, ‘सामना’तून घणाघात

Saamana Editorial Video : ‘गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी…’, ‘सामना’तून घणाघात

| Updated on: Mar 19, 2025 | 12:36 PM

'भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी वाढतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा !', असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे. इतकंच नाहीतर यावेळी भाजपवर देखील निशाणा साधण्यात आलाय.

‘महाराष्ट्र दुभंगला आहे, धर्मद्वेषाने पेटला आहे’, असं सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या पेटवापेटवी सुरू आहे. चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला आहे, असं म्हणत सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात एकोपा निर्माण केला. आज मात्र महाराष्ट्र दुभंगला आहे व धर्मद्वेषाने पेटला आहे. कुराणाची प्रत कोठे मिळाली तर सन्मानाने परत करा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र सांगते. मात्र नागपुरात कुराणातील आयती जाळण्याचा प्रकार झाला. राजापुरात होळींचे खांब मशिदीत घुसवून दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात पेटवापेटवी सुरू आहे ती औरंगजेबाच्या नावाने. चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला आहे. कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतो आहे, असं म्हणत सामनातून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्यात आली आहे. भाजपमधील नवहिंदुत्ववादी चोंगट्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरूद्ध राजकीय रौद्ररूप धारण केले आहे आणि महाराष्ट्रातील वातावरण बिघडवले असे म्हणत समानातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

Published on: Mar 19, 2025 12:31 PM