Sanjay Raut : महाराष्ट्रातील घोटाळ्याची तुलनाच होऊ शकत नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पावर टीका केली आहे.
या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार सुरू आहे त्याची तुलना कुठल्याही जगातल्या घोटाळा संदर्भात होऊ शकत नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 19 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इगतपुरी ते समृद्धी मार्गाच्या अवस्था खराब आहे. या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये 50% घोटाळा आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. असंही टोला यावेळी राऊतांनी लगावला आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेना राष्ट्रवादीचे लोक विकत घेण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट झाला. आज या रस्त्याचे अवस्था जाऊन पहा, आता हे लोक शक्तीपीठाच्या मार्गावर लागले. वीस हजार कोटी मंजूर झाले, त्यातले किमान दहा हजार कोटी बाहेर येतील आणि हे दहा हजार कोटी राज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरले जातील हे मी तुम्हाला आता सांगतो. हे ड्रीम प्रोजेक्ट ठेकेदारांकडून हजारो कोटी रुपये भरण्यासाठी झालेले आहेत. सगळ्यात आधी आपले खिसे भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक ब्लॅक मनी मधून खरेदी विक्री सुरू करा समृद्धी महामार्गासंदर्भात ठेकेदारांना दोष धरून चालणार नाही त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढला पाहिजे, अशीही टीका संजय राऊतांनी केली आहे.
