राज्यात फडणवीस अ‍ॅक्ट लागू! संजय राऊतांची खणखणीत टीका

राज्यात फडणवीस अ‍ॅक्ट लागू! संजय राऊतांची खणखणीत टीका

| Updated on: Jul 30, 2025 | 1:08 PM

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

राज्यात नवा ‘फडणवीस कायदा’ लागू झाला आहे, ज्याअंतर्गत ‘समज द्या आणि सोडून द्या’ असे धोरण अवलंबले जात आहे. काल काही मंत्र्यांना समज देऊन सोडण्यात आले. जर सरकार निर्लज्जपणे भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल, तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे कसे होणार? अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. वसई-विरारमधील ईडीच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खोचक टीका केली.

राऊत पुढे म्हणाले, वसई-विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीने छापा टाकला. त्यांची त्या पदावर नियमबाह्य नेमणूक करण्यात आली होती, आणि यासाठी दादा भुसे यांचा आग्रह होता, हे मी अनेकदा पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भुसे यांनी ही नेमणूक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती, जी नंतर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली.

ते म्हणाले, सर्वांवर कायदेशीर कारवाई होईल, आणि जन सुरक्षा कायद्यांतर्गत अटकही होईल. पण मंत्रिमंडळातील संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि संजय राठोड यांच्यासारखे आरोपी, ज्यांनी कारागृहात असायला हवे, ते बाहेर फिरत आहेत, तर ज्यांनी बाहेर असायला हवे, ते तुरुंगात आहेत. याचे कारण म्हणजे राज्यात ‘फडणवीस ॲक्ट’ लागू आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.

Published on: Jul 30, 2025 01:08 PM